मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

विचार कर....


मानवाचा तुजला जन्म लाभला
मानवतेचे तू रक्षण कर

विचार कर...

गुरुंचा तू आदर करून
आज्ञेचे तू पालन कर

विचार कर...

लोभांचा तू त्याग करून
कष्टांचा तू स्वीकार कर

विचार कर...

ध्येय निष्ठ तू सदैव राहून
पाउल प्रगतीचे पुढेच कर

विचार कर....

विचार कर....


मानवाचा तुजला जन्म लाभला
मानवतेचे तू रक्षण कर

विचार कर...

गुरुंचा तू आदर करून
आज्ञेचे तू पालन कर

विचार कर...

लोभांचा तू त्याग करून
कष्टांचा तू स्वीकार कर

विचार कर...

ध्येय निष्ठ तू सदैव राहून
पाउल प्रगतीचे पुढेच कर

विचार कर....

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

चाल पुढे...


तू चाल पुढे तरुणा
माघार न घेणे आता, हा ठरला आपुला बाणा

फौज ठाकली अकबरची मोठी
राजपूत सैन्याची लागली कसोटी
जमवून इमानी भाले,हळदी घाटी झुंझला राणा

कलंक शिव वैभवास जणू
सिंहगडावर उदयभानू
पुत्र विवाह सारून बाजूला,लढवायला गेला ताना

उभी सामोरी मालिका संकटांची
सत्कार्य करतांना चिंता नको त्याची
आडव त्यांना होऊन धैर्यमेरु,कितीही येऊ दे त्या संकटांना

ज्ञान करून घे तू सर्वंकष
चरित्र्यावरही नसू दे कलंक
एकटा करून भारतीयांची,बलवान कर संघटना

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

सूर्योदय उद्याचा.....

उद्याचा सूर्योदय माझाच असेल
कारण सूर्यास्ताला मी मागेच टाकलंय

आत्मविश्वासाचा सोम्रस प्राशन करून
प्रार्ब्धचा मी स्वीकार केलाय
असतील व्याधी असतील संकटे
जरी असोत यातना दु:ख भयंकर
हसत मुखाणे मी सहन केलंय
कारण मला माहीत आहे
उद्याचा सूर्योदय माझाच असेल
आणि सूर्यास्ताला मी मागेच टाकलंय

असेल तेवढे कर्म करून
कष्ठांचा मी स्वीकार केलाय
जरी नसेल नात्या-गोत्यांचे जाळे
त्याचा ही मी स्वीकार केलाय
कारण मला माहीत आहे
उद्याचा सूर्योदय माझाच असेल
आणि मी सूर्यास्ताला मागेच टाकलाय.