तू चाल पुढे तरुणा
फौज ठाकली अकबरची मोठी
राजपूत सैन्याची लागली कसोटी
जमवून इमानी भाले,हळदी घाटी झुंझला राणा
कलंक शिव वैभवास जणू
सिंहगडावर उदयभानू
पुत्र विवाह सारून बाजूला,लढवायला गेला ताना
उभी सामोरी मालिका संकटांची
आडव त्यांना होऊन धैर्यमेरु,कितीही येऊ दे त्या संकटांना
ज्ञान करून घे तू सर्वंकष
चरित्र्यावरही नसू दे कलंक
एकटा करून भारतीयांची,बलवान कर संघटना
मस्त!
उत्तर द्याहटवाधन्यवाद अतुल.
उत्तर द्याहटवा