शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

दुरदर्शन

 ☯️ *दुरदर्शन* ☯️


आमच्याकडे टिव्हीच नव्हता, 

दुसरीकडे जाऊन पहायचो, 

टॉम अँड जेरी,

तर लगेच आईच्या हाकेने

पळायचो आपआपल्या घरी.

दुरदर्शनच्या टिपीकल आवाजाने, 

अजुन देखील टवकारतात कान,

टॅवण्याव ण्यावण्याव हा सूर 

होता भलताच भारी,

कुठे टिव्ही सुरू झाला समजून 

जमायची मंडळी सारी. 

चित्रहार,  छायागीत, रंगोली 

गाणी लागायची जुनीवाली.

मुक बधीरांच्या बातम्यांनी, 

इशारे झाले अंगवळणी 

प्रादेशिक चित्रपटाची मजा भारी, 

भाषेची गोडी यात लागली खरी

सुरभी मालिकेने दर्शन झाले जगाचे, 

आपणही करावा विक्रम असे तेव्हा वाटायचे 

खरखर टिव्हीची डोक्यात जायची, 

मग चढाओढ अँटेना फिरवायची 

कसला भारी होता राव काळ, 

टिव्हीच्या जगातील होती तीच सकाळ 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आली दिवाळी

 'पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा'


लहानपणी दिवाळी  म्हटले की फराळ बनवण्यासाठी सगळीकडे एका उत्साहात सुरवात होत असे.  करंजी, लाडू, चिवडा,  चकली असे ना ना विविध पदार्थांनी वाडा दरवळत असे.  प्रत्येकाकडे जाऊन त्यांची चव पहाण्यात एक वेगळी मजा यायची. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे,  नाही तर नरकात जाल हं,  असे आईचे शब्द अजुनही कानी ऐकू आल्यासारखे वाटतात.  मग आम्ही सगळे भावंड पटापट ऊठून,  बऱ्याचदा झोपेतच आंघोळीला जायचो.  गरम गरम पाणी अंगावर पडल्यावर जे लख्ख डोळे उघडायचे. मग दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओरडत फुलबाजी घेऊन पळत सुटायची,  मजा काही औरच.  

जसे जसे मोठे होत गेलो,  नोकरी निमित्त बाहेर पडलो. पण एक मात्र नक्की दिवाळीला एकत्र यायचे,  असे आम्ही सगळ्या भावंडांनी ठरवले.  आणि अजून देखील अंगणात बंब पेटवून पाणी गरम करण्यासाठी,  वडिलोपार्जित बंब देखील तेवढ्यासाठी जपून ठेवला आहे.  दिवाळी जवळ आली कि तो माळ्यावरून खाली काढुन,  कोळसा आणून तो पेटवण्याची जी एक्साइटमेंट आत्ताच्या पिढीला दाखवताना त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव टिपताना एक वेगळाच आनंद मिळतो.  ही आपली एकत्र बांधून ठेवणारी संस्कृती आणि खाद्यसंस्कृती देखील विलक्षण आनंद देऊन जाणारी आहे.  

सरते शेवटी मला काही ओळी लिहिल्या शिवाय रहावत नाही.  


अभ्यंगस्नानाची मज्जाच न्यारी

दिमतीला असे  बंबाची  स्वारी।।

सकाळी सकाळी आई पेटवे बंब

मग आंघोळीला होई भराभर आरंभ।।

कोळसे,ढलप्या,भुसा त्याचा खाऊ

पाठोपाठ आंघोळीला जाई बहीणभाऊ।।

खालून काढा गरम पाणी

वरून ओता गार पाणी।।

कितीका येईनात पैपाहुणे

ह्याचे काम गरम पाणी देणे।।

अंगणात असे ह्याचे स्थान

तत्पर सेवा देण्यात हा महान।।

चकचकीत, तांबूस ह्याचे रूप

गरम  गरम  पाणी देई  खूप।।

काळाच्या ओघात बंब पडला मागे

दिवाळीत त्याच्या आठवणीने हुरहूर लागे।

गिझर,हिटर ने घेतलीय त्याची जागा

बंबाची सर त्यांना येईल का सांगा। 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

Happy Diwali

 🪔 *Happy Diwali* 🪔


Let's indulge in "Diwali Cleaning" of our True Homes : *Our Minds* 


Clear *Our Minds* off the hugely Messy Stuff


Take out Expectations, Regrets, Worries, Comparisons, Grudges, Secrets and Complexes; I am sure it's not tough 


Let's create valuable space in our Minds for Positivity, 

Give it a renewed experience of Peace, Tranquility & Prosperity.


Let's brighten our Lives in an unique way this Year. 

Celebrate Diwali by keeping Mind & Body Healthy, for ever & ever


*Happy Deepawali & Warm Regards,*


ShishirArchanArush

स्वत्वाची स्पर्धा

 स्पर्धेत नको मत्सर, 

स्पर्धेत असावे तत्पर

स्पर्धा असावी स्वतःशी


स्पर्धा पहावी करुन,  

स्पर्धा अनुभवावी हारून

स्पर्धा असावी स्वतःशी


स्पर्धा असावी स्व कर्तृत्वाची,

स्पर्धा असावी स्वत्वाची, 

स्पर्धा असावी स्वतःशी


स्पर्धा असावी स्व प्रगतीची, 

स्पर्धा असावी स्व प्रचितीची, 

स्पर्धा असावी स्वतःशी


स्पर्धा असावी आत्मपरीक्षणाची,

स्पर्धा असावी आत्मनिर्भरतेची,

स्पर्धा असावी स्वतःशी


स्पर्धा घडवते व्यक्तिमत्व, 

स्पर्धा टिकवते अस्तित्व, 

स्पर्धा असावी स्वतःशी


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


डॉक्टर थोर तुमचे उपकार

 कोणताही असु देत आजार, 

त्यावर करता तुम्ही योग्य उपचार, 

डॉक्टर थोर तुमचे उपकार 


कोणतीही व्याधी,  कोणतीही संकटे,

यातून मार्ग दाखविता तुम्ही एकटे,

डॉक्टर थोर तुमचे उपकार 


दैवासम आपली व्यक्तीरेखा भासे,

तारण्या आम्हा दूजा कोणी नसे, 

डॉक्टर थोर तुमचे उपकार 


सद्य परिस्थितीतीत कार्य थोर आपले, 

मानसिकतेबरोबर आजारही जपले, 

डॉक्टर थोर तुमचे उपकार 


निस्सीम सेवा,  अगाध परिश्रम, 

बनविले प्रत्येकास पुन्हा सक्षम, 

डॉक्टर थोर तुमचे उपकार 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

मामाचं पत्र हरवलं

पत्र म्हणजे काय असते

हे ठाऊक नाही या नवीन पिढीला, 

या नुसत्याच आठवणी बनून 

राहिल्या आहेत आजच्या घडीला 


पोस्टमन काका येत असत,  

मामाचं पत्र देत असत,

आत्ताची पिढी या प्रकरणी 

अगदी अनभिज्ञ असत


मामाचं काय पण सगळेच 

पत्र व्यवहार पडले मागे,

नुसतच हे  ब्रो व्हॉट्स अप

ऑलवेल विचाराने कसे जुळतील धागे 


आजकालच्या जमान्यात लिहीण्याची 

पार सवय मोडली आहे, 

त्यामुळे शब्द संपत्ती पण 

मागे पडली आहे 


ऑनलाईनच्या काळात 

कम्प्युटर गेमने फिरवलय डोकं

माझ्या मामाच पत्र हरवल 

या खेळाचं आठवणींनी भरलं खोकं


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

गुलाबी थंडी

आमच्या गावाकडल्या थंडीची औरच मजा, 
कितीबी थंडी असो आम्हाला नाय वाटत सजा

दिवसभर शेती करून थकून येतो घरी, 
खाया मिळते मग गरम गरम झुणका भाकरी 

थंडीच्या दिवसांत खाण्या पिण्याची मजा असते भारी, 
शेकोटीला घेर धरून बसतात मंडळी सारी 

आज्जीच्या साडीची घोंगडी बाहेर निघतात, 
अंगावर घेताच ऊब निर्माण करतात 

दरवळतो सुगंध आल्याच्या चहाचा, 
साखर नव्हे आमचा चहा असतो बरका गुळाचा 

यावा एकदा गावाकडं थंडीच्या दिवसांत, 
गुलाबी थंडीत इकडच्या, पाखरेही विसावतात 

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

रविवार

 सगळ्यांचा आवडता वार,  असतो रविवार,

आठवडाभराचा थकवा घालवायचा वार


यजमान आणि मुलं असतात घरी, 

जपून माझ्या भावनांना, म्हणतात मला परी


एरवी असायची पिझ्झा बर्गरची चंगळ, 

या लॉकडाऊन पायी सगळाच गोंधळ 


मला वाटले आता रविवारी लागली आपली वाट, 

पण ह्यांच्या नवनवीन रेसीपींनी ठेवला माझा थाट 


कधी असे मॅगी पिझ्झा, तर कधी नीर डोसा,

यासाठी खास रेसिपीचे युट्यूब बघत बसा 


मिळून कामं सारी पडली पार, 

त्यामुळे लॉकडाऊनमध्ये देखील आवडला हा  रविवार 


घरच्या स्रीच्या भावना समजून आठवड्याची झाली आखणी, 

एकमेकांना सहाय्य करत कामाची पण झाली भारी वाटणी


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई