सगळ्यांचा आवडता वार, असतो रविवार,
आठवडाभराचा थकवा घालवायचा वार
यजमान आणि मुलं असतात घरी,
जपून माझ्या भावनांना, म्हणतात मला परी
एरवी असायची पिझ्झा बर्गरची चंगळ,
या लॉकडाऊन पायी सगळाच गोंधळ
मला वाटले आता रविवारी लागली आपली वाट,
पण ह्यांच्या नवनवीन रेसीपींनी ठेवला माझा थाट
कधी असे मॅगी पिझ्झा, तर कधी नीर डोसा,
यासाठी खास रेसिपीचे युट्यूब बघत बसा
मिळून कामं सारी पडली पार,
त्यामुळे लॉकडाऊनमध्ये देखील आवडला हा रविवार
घरच्या स्रीच्या भावना समजून आठवड्याची झाली आखणी,
एकमेकांना सहाय्य करत कामाची पण झाली भारी वाटणी
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा