☯️ *दुरदर्शन* ☯️
आमच्याकडे टिव्हीच नव्हता,
दुसरीकडे जाऊन पहायचो,
टॉम अँड जेरी,
तर लगेच आईच्या हाकेने
पळायचो आपआपल्या घरी.
दुरदर्शनच्या टिपीकल आवाजाने,
अजुन देखील टवकारतात कान,
टॅवण्याव ण्यावण्याव हा सूर
होता भलताच भारी,
कुठे टिव्ही सुरू झाला समजून
जमायची मंडळी सारी.
चित्रहार, छायागीत, रंगोली
गाणी लागायची जुनीवाली.
मुक बधीरांच्या बातम्यांनी,
इशारे झाले अंगवळणी
प्रादेशिक चित्रपटाची मजा भारी,
भाषेची गोडी यात लागली खरी
सुरभी मालिकेने दर्शन झाले जगाचे,
आपणही करावा विक्रम असे तेव्हा वाटायचे
खरखर टिव्हीची डोक्यात जायची,
मग चढाओढ अँटेना फिरवायची
कसला भारी होता राव काळ,
टिव्हीच्या जगातील होती तीच सकाळ
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा