काही नाती रक्ताची नसतात,
पण तरीही आपुलकीची असतात
कधी नात्यांचा बंध नसला तरीही
ऋणानुबंधाने जोडलेली असतात
आयुष्यात सुख दुःखात, चढ उतारात
सतत साथ देत असतात
इथे अपेक्षांचे ओझे नसते
भावनांनी मन जुळलेले असते
ऋणानुबंध या नावातच
अबोल नात्यांचे बंध असतात
सलोख्याचे संबंध जणू
मंद सुगंधाने दरवळतात
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा