उगाच काय हो उगाच काय
मुश्किल वगैरे आम्हाला माहित नाय
आपलं काम आपल्याला चोख करायच हाय
येऊदेकी संकटे घाबरायचे काम नाय
कोण म्हणे आम्ही करतो हाय हाय
घरी राहूनबी आम्ही मदत केली हाय
ऑनलाईन पुस्तके वाचून काढली हाय
कविता करण्याचा तर फडशा पाडला हाय
नन्नाचा तर पाढा आम्हाला गायचाच नाय
प्रत्येकाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न हाय
वेगळे राहुन एकात्मतेचा भाव हाय
कारण या नंतर भेटीची ओढ हाय
चला लागा कामाला नका बसु पसरून पाय
सर्वांनी मिळून परिस्थितीवर मात करायची हाय
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा