ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
कार्य कसे होई आपल्या आशिर्वादाशिवाय
तुच संरक्षणकर्ता, तुच पालनकर्ता
संपूर्ण विश्वाचा तुच कर्ता धर्ता
तुच ओमकारेश्वर, तुच अर्ध नारी नटेश्वर
कलियुगाचा तुच ईश्वर
तुच आहे शंभू शंकर
स्मरणाने तुझ्या कार्य होई तत्पर
तुच आहे भोलेनाथ
संकटात देई भक्ताला साथ
तुच आहे गौरी शंकर
तुझी सेवा करु निरंतर
कृपा असावी तुझी आम्हावर
तुझे भक्त गण आहेत घरोघर
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा