बुधवार, १० मे, २०२३

गणपती पुजन

 गणपती पुजनाने होतो श्री गणेश 

आपल्या आयुष्यात होतो सकारात्मकतेचा प्रवेश 


परंपरेची जाणीव आपल्याला असावी 

सण वाराची आवड पुढच्या पिढीला लागावी 


एका हाती घंटा , तर दुसर्‍या हाती आरतीची थाळी

समक्रमिता शिकवते आपणास दर वेळी 


टाळ्यांच्या गजराचे शास्रच निराळे 

रोगराई जणू त्याने दूर पळे


उत्साहाने सळसळते लाट 

उत्सवाची असते सुंदर पहाट 


एकात्मतेचा भाव कायम राहतो

आप्त स्वकीयांचा संपर्क राहतो 


पुढच्या वर्षी लवकर या, याची असते आस

सर्वांना आवडतो बाप्पाचा सहवास


अर्चना दीक्षित 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा