बुधवार, १० मे, २०२३

स्त्री अस्तित्व

 मला नको कोणाची सहानुभूती 

त्याने मंदावते मानसिक गती 

जपायचे आहे मला माझे अस्तित्व 

त्यातच आहे माझे स्वत्व 


मुलगी,  बहिण, आई 

म्हणून जगायचे आहे 

माझ्यामधील स्रित्वाला 

मलाच जपायचे आहे 


संसाराच्या बंधनात 

पत्नी म्हणून मिरवायचे आहे 

नोकरीच्या वातावरणात

कर्तुत्ववान बनायचे आहे 


आयुष्याच्या रंगमंचावर 

अनेक भूमिका साकारायच्या आहेत

माझ्यासारख्या धडपडणाऱ्या 

अनेक स्रियां घडवायच्या आहेत 


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा