तू घे भरारी
कोणतेही काम मोठे अथवा नसते छोटे
हिच शिकवणूक मानवास बनविते मोठे
कोणतेही क्षेत्र नसते चांगले किंवा वाईट
यश मिळविण्यासाठी द्यावी लागते फाईट
कर्तव्याने घडतो माणूस, कर्तव्य कधी चुकवू नये
कार्य मग्नता ध्येय साधकाने विसरू नये
कार्य पूर्तता कसून करावी
हिच आयुष्याची शिदोरी असावी
संधीचा लोभ नसावा, संधीचा लाभ घ्यावा
यशापयाशाचा सोडून विचार, स्वप्न पूर्तीचा ध्यास धरावा
निंदकाचे घर असावे शेजारी
सोडून बंधने तू घे भरारी, तू घे भरारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा