बुधवार, १० मे, २०२३

मास्तर तुम्ही नसता तर

मायेची ऊब निर्माण झाली नसती, 

जर पहिली गुरु आई नसती


पडल्यावर उभी राहू शकले नसते,

जर बाबांनी हात धरून उठवले नसते


शाळेची शिस्त कधी कळलीच नसती, 

जर गुरुजींनी छडी फिरवलीच नसती


नात्यांची ओढ लागली नसती,

जर आप्तेष्टांची पाठीवर थाप नसती


सुख दुःखाची किंमत कळली नसती,

जर मित्र मैत्रिणींची साथ मिळाली नसती


मिळून काम करणे शिकले नसते,

जर बॉसने टिम वर्क दिले नसते 


दुनियादारी शिकलेच नसते, 

जर स्वतःच्या चौकटीत बंदिस्त असते 


सर्वांगीण प्रगतीची कवाडे उघडली नसती, 

जर मास्तर म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे नजर गेली नसती


तेव्हा आपणा सर्वांचे धन्यवाद करूच शकले नसते, 

जर शिक्षक दिनाचे औचित्य साधले नसते


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा