बुधवार, १० मे, २०२३

मातृ देवो भव

ए आई आणि अहो आई

हे तर शाब्दिक खेळ बाई

एक आई जन्म देई 

तर दुसरीच्या सेवेने जन्माचे सार्थक होई 

एक आई नात्यांची गुंफण घालणारी 

तर दुसरी नात्यांची ओढ लावणारी 

आईची ममता दोघींच्या ठाई

त्यांच्या मायेत अंतर नाही 

करुयात सन्मान ए आई आणि अहो आई चा 

आशिर्वाद असो नेहमीच प्रेमाचा

नेहमीच असावे मात्रृ देवो भव 

आईच्या ममतेचं गुण गान गावं


सौ अर्चना दीक्षित 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा