बुधवार, १० मे, २०२३

व्यसन असावं असं

 व्यसन असावं असं 

ज्यापासून मुक्ती नव्हे

तर मिळेल शक्ती असं


कोणाला माणूस जोडण्याचे व्यसन

कोणाला माणूस घडवण्याचे व्यसन 

कोणाला सदाचाराचे व्यसन

कोणाला देव भक्तीचे व्यसन 


कोणाचे व्यसन अनुभवातून शिकण्याचे

कोणाचे व्यसन शिक्षणातून अनुभवाचे

कोणाचे व्यसन आठवणींना साठवण्याचे

कोणाचे व्यसन साठवणीतील आठवणींचे


व्यसनाला नकारात्मक का मानावे 

व्यसनाला सकारात्मक रुप द्यावे


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा