ओल्या मातीचा सुगंध
दरवळी मंद मंद
जन्मोजन्मीचा असे बंध
करतो जीवाला धुंद
मातीशी जुळले आमचे नाते
भावनांनी मन तिथेच जडते
पिक देखील प्रेमानेच वाढते
शेतकरी कुटुंबाला आयुष्य कमी पडते
नका हेराऊ हक्क आमचा
राजकारण घेई जीव शेतकर्याचा
ज्याची शेती त्याचा लाभ
कायदा मंजूर झाला आज
मध्यस्थीची आम्हा गरज नसे
या मातीचे आम्हावर उपकार असे
फेडण्या कर्ज आता मिंधे नाही होणार
इतरांच्या सांगण्यावरून पिक नाही जाळणार
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा