ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले,
जणू होती ईश्वराचीच मुले
ज्योतिबांनी प्रकाशाची ज्योत जागवली,
अंधकाराचा दिवा मालवून टाकला
सावित्रीबाई फुले यांनी जणू वसा घेतला,
स्री शिक्षणासाठी पदर खोचला
स्रियांचे दारिद्रय संपुष्टात आले,
स्री शिक्षणाचे महत्व जाणवले
सोप्पा नव्हता हा क्रांतीचा काळ,
या क्रांतिसाठी जणू त्यांनी पेललं आभाळ
जनतेने विरोधात ताशेरे ओढले,
त्यांनाही समाज कल्याणाचे महत्त्व पटवले
कार्याला आपल्या करुन सलाम,
शिक्षणाचे खरोखर महान काम
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा