कशाला असावे धुम्रपानाचे व्यसन
ज्यामुळे होई आयुष्याची घसरण
लागुद्या माणूस जोडण्याचे व्यसन
कोणाला माणूस घडवण्याचे व्यसन
कोणाला सदाचाराचे व्यसन
कोणाला देव भक्तीचे व्यसन
असुद्या व्यसन अनुभवातून शिकण्याचे
कोणाचे व्यसन शिक्षणातून अनुभवाचे
कोणाचे व्यसन आठवणींना साठवण्याचे
कोणाचे व्यसन साठवणीतील आठवणींचे
शपथ घ्यावी आज व्यसनमुक्तीची
योग्य वेळी धुम्रपानाला विरोध करण्याची
आज जागतिक धुम्रपान विरोधी दिन
सुटतील व्यसने तोच ठरेल सुदिन
व्यसनाला नकारात्मक का मानावे
व्यसनाला सकारात्मक रुप द्यावे
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा