सांग ना बाबा, आज मी श्वास कसा घेऊ
या कपड्याच्या मास्कने गुदमरून जाई जीव
ऑक्सिजनच्या अभावाने काळजाचा ठोका चुकला
तेव्हा कुठे मानवाला जीवनाचा महिमा कळला
बाबा तू म्हणाला होतास नियतीची हीच चित्तरकथा
तुझ्या नसण्याने माझ्यातील पोकळीची कोणास सांगु व्यथा
एक एक करून संपत आहेत आप्तेष्टांचे जीव
मानवाला कधी येईल मानवाची कीव
समज मला कमी असेल या सर्व बाबींची
सांगड घालेन तरीही मी आज भावनांची
चल लाऊयात झाड आज प्रत्येकी एक
वाचतील त्याने प्राणीमात्रांचे जीव अनेक
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा