बुधवार, १० मे, २०२३

कॉलेज कट्टा

 कॉलेज कट्टा विषयावर लिहिताना गंभीर कस होऊ,

हा विषय तर आपल्या सर्वांना प्रिय ना रे भाऊ


इथेच बनतात दोस्त यार, 

काहींना होतो म्हणे पहिला प्यार,

आपलं मात्र तसलं काही नव्हत,

असल्या परीस्थिती ही मन रमत होतं


कट्ट्यावरच्या चर्चेला कधी यायच उधाण,

विषय रंगला की फर्मान सुटायच, चल चहा आण


राजकारण ते समाजकारण सगळे विषय हाताळायचे, 

जणु काही समाज कल्याणाचे गांभीर्य आम्हालाच असायचे


यारी दोस्तीची दुनिया सारी, 

इथेच शिकलो दुनियादारी 

मैत्रीचे बंध इथेच निर्माण झाले, 

सुख दुःखात नेहमी तेच मदतीस आले


त्या दोस्तीची कहाणी अगदीच न्यारी, 

आजही जी आम्हाला सगळ्यांना प्यारी


सोशल मीडिया मदतीने पुन्हा सगळे एकत्र आलो आहे, 

आमच्या व्हॉट्स अप ग्रुपचे नाव आम्ही कट्टा गँग दिलं आहे 


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा