लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही
हे ब्रीद वाक्य आपणास शिकविते खुप काही
जाणिव असावी लोकहिताची
आपल्या मधील माणुसकीची
भावना असावी समानतेची
प्रेम भावना बंधुत्वाची
जातीपातीचे तोडून बंधन
माणुसकीला करावे वंदन
आपुलकीचे बनावे स्पंदन
देश बनेल एक नंदनवन
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ
प्रजेच्या सुखासाठी शपथ घेऊ
सत्तेच्या हव्यासाला दूर ठेऊ
भेद मिटवून एक होऊ
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा