मनाची जरी घालमेल
जुळवत होती ती ताळमेळ
उत्साहात केलं तिने नवीन वर्षाचे स्वागत
परिस्थितीला सामोरे जाण्याची तिच्यात आहे ताकद
आज नव्हती हळमळ
सुरु झाली तिची धावपळ
भविष्याच्या उपक्रमाला केली तिने केव्हाच सुरुवात
त्यामुळे वेळेच्या नियोजनाची चिंता नव्हती वर्तमानात
एकटीची नव्हती चळवळ
समाज कार्याची तिची तळमळ
पहाट उजाडली विश्वची माझे घर म्हणत
समाजाने पण साथ दिली मग सत्कार्य घडवत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा