बुधवार, १० मे, २०२३

आयुष्याचे गणित

 बेरीज,  वजाबाकी,  गुणाकार आणि भागाकार, 

यांनी येतो आयुष्याला एक सुंदर आकार 


मला होती गणिताची भलतीच भिती, 

मग लक्षात आले हीच आहे जग रिती 


आत्मसात करण्यास याचे योग्य ज्ञान, 

भल्या भल्यांंचे हरवते भान


नकारात्मक बाबींचा गुणाकार, भागाकार नसतो, 

आयुष्यातून त्यांची वजाबाकी हाच एकमेव उपाय असतो


नवीन नात्यांची बेरीज करत हातचे पण जोडायचे बरं का,

तरच सकारात्मकतेचे जाळे भवताली पसरेल बरं का 


या गणिताच्या तासाला नसतात कोणी प्रशिक्षक, 

आपले अनुभव हेच असतात आपले शिक्षक 


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा