रविवार, १७ जुलै, २०११

आयुष्याच्या वाटेवर....



खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

एक वळण संपल्यावर दुसरे शोधावे लागतेच का?
रखरखत्या उन्हातही सावली शोधावी लागतेच का?
काटेरी कुंपण ओलांडल्यवरही लाकडी दार असतेच का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

प्रेमाचा भंग झाल्यावरही प्रेम जपावे लागतेच का?
विरहाच्या अश्रूंना देखील रुमलची गरज असते का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

सादानंतर प्रतिसादाची खरी गरज असते का?
सुखाबरोबर दु:खाची छटा असावी लागते का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

तारुण्यानंतर वार्धक्याची चाहूल यावी लागतेच का?
कवितेसाठी शब्दांची गरज असावी लागतेच का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....
एक वळण संपल्यावर दुसरे शोधावे लागतेच का?

मंगळवार, १२ जुलै, २०११

ऐट मोठ्या लोकांची !

मोठ्या लोकांची ऐटच वेगळी....

हं! काय कमाल आहे?
त्यांनी कसेही कपडे घातले
तर त्याला ' fasion' म्हणतात
इतरांनी तेच कपडे घातले तर
त्यांना मात्र 'दलभदरी'म्हणतात

मोठ्या लोकांची ऐटच वेगळी....

त्यांनी कसंही गाणं म्हटलं तर
त्याला प्रयत्नांची साथ दे म्हणतात
इतरांनी तसंच गाणं म्हटल तर
त्याला खरं-खरणारं नर्ड म्हणतात

मोठ्या लोकांची ऐटच वेगळी....

त्यांनी एखादा पदार्थ केला तर
त्याला 'new reciepe'  म्हणतात
इतरांनी तोच पदार्थ केला तर
त्याला 'धीरडा बिघडलं' म्हणतात

मोठ्या लोकांची ऐटच वेगळी....

त्यांनी काही खरेदी केलं तर
त्याला 'shopping hoby' म्हणतात
तेच इतरांनी करुन पाहिलं तर
त्याला 'उधलेगिरी' म्हणतात

मोठ्या लोकांची ऐटच वेगळी....

त्यांनी प्रेम केलं तर
त्याला 'fair love' म्हणतात
इतरांनी प्रेम केलं तर
त्याला 'afair' 'लफड' म्हणतात!

प्रतिसाद

मला सोडून जायचे  होते तर
जन्मो-जन्मीची सोबत मागितली कशाला?

बरोबर जगायचे नव्हते तर
स्प्तपदीची साथ दिलीच कशाला?

जन्मभरची सोबत नव्हती तर
प्रेमाची साद घातलीस कशाला?

तुझ्या आठवणीत होरपळायचं होतं तर
आठवणी देऊन गेलासच कशाला?

मला एकदा तरी या सवलाचा
जबाब देशील का रे?

माझ्या सादाला प्रतिसाद म्हणून
एकदाच तू येशील का रे?

तुफान..

वादळाला सुन्न करणारं
तुफान आलंय तुफान
थंडावलेल्या बर्फालाही
केलंय ज्यानं हैराण
क्रांतीची मशाल पेटवून
दिलंय ज्यानं जीवन दान
अशाच एका वादळाला प्रेमाने
भारावून लिहले ज्याने प्रेम गान
घट्ट तिच्या मिठीत जाऊन
केलं ज्याने बेभान
वादळाला सुन्न करणारं
तुफान आलंय तुफान

रविवार, १० जुलै, २०११

आठवतंय तुला?

*अबोल नाते* 

आठवतंय तुला?
आपलं हातात हात घालून
बागेतून फिरत राहणं
जाताना तू कळीच असायचीस
पण येताना फुलाप्रमाणे फुलून यायचीस

   आठवतंय तुला?
   मला जीवनाच्या वाटेवर
   ठेच लागली तेव्हा
   संपूर्ण जीवनाचा अर्थ समजवताना
   माझ्या जखमेवर मलम् लावायचीस

आठवतय तुला? 
आपल्या नात्याला आपण शब्दांचे 
बोल देऊच शकलो नाही 
कारण आपले अबोल बोल देखील बोलके होते

आठवतंय तुला?
मी तुला एकदाच म्हटलं होतं
तुला डोळे भरून पाहायचं आहे
तू याच एका वाक्यासाठी स्वत:चे
डोळे मला देऊन निघून गेलीस.....!

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई

वळण

येथे प्रत्येक सोनेरी किरणाला
सूर्यकिरण म्हणून चालत नाही


   आणि वळण दिसलं म्हणून
   वलूनही चालत नाही

येथे प्रत्येक फळाची चव
अवीट आणि वेगळी असते

   आणि एखादं नासक म्हणून
   दुसरं ही नासक समजून चालत नाही ......!

शुक्रवार, ८ जुलै, २०११

जोडीदार

बोलायचा प्रयत्न केला तर
मनातले शब्द ओठांवर येऊन थांबतात
बोलणार तरी कोणाशी कारण
सगळे आपले असून परके वाटतात

नाते जुळवणे सोपं असतं 
पण नात्याना जपणं तितकच अवघड असतं 
नात्यांची जर जुळली जोडी
तर खरी जीवनात टिकते गोडी

जोडीत असते माय लेक, बाप लेक 
नणंद भावजय किंवा सासु सून 
असतात त्यात दिर जाऊ,  इतर नातेवाईक 
नवरा बायको यांची जोडी मात्र असावी लाखात एक 

टिकवाल जोडी,  टिकवाल नाती जर योग्य प्रकारे, 
तर आणि तरच आयुष्याची होईल सफलतेने नाव पार 
म्हणून तर म्हटलं आहे नका करू व्यभिचार, 
टिकवा आपल्या नात्याचा जोडीदार 

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई 







सहारा

कधी कधी तुझे प्रत्यक्ष
अस्तित्व नसले तरी देखील
तुझे अप्रत्यक्ष अस्तित्वच मला
खूप सहारा देऊन जाते.

अनोळखी

माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?

सत्याचे गाव दिसत असूनही
मी  स्वप्नांच्या गावी का जाते?

कळीच्या उमळण्याला मी संपणे का म्हणते?
पिकलेलं पान गळायाच्या आधी माझी मान का वळते?

माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?

घुंगराच्या बोलांवर मी शांत
बसुच कशी शकते?

सुरांच्या मैफीलीत जाउनही मी
मनातल्या मनातच का गुणगुणते?

माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?

ते नातं वेगळाच असतं......

ते नातं वेगळंच असतं
Friends Together Theme Mobile Themeजे आपल्या मैत्रीचं असतं
ते अगदी निर्मळ असतं
ते अगदी कोमल असतं
आणि एखाद्या धाग्याप्रमाणे नाजूक असतं

ते नातं वेगळच असतं
जे आपल्या मैत्रीचं असतं
अपेक्षेचा डोंगर नसतो
मत्सराची दरी नसते
आणि उगाचच रुसणार्‍याचं जाळही नसतं

ते नातं वेगळंच असतं
जे आपल्या मैत्रीचं असतं
मैत्रीत कसले हेवे-दावे
नाही त्यात पाठपुरावे
आणि नाही त्यात कसलेच काचकडी चे देखावे

ते नातं वेगळंच असतं
जे आपल्या मैत्रीचं असतं
नसतं त्यात कसलंच बंधन
आणि तोंड देखल वंदन
आणि असतं फक्त झिजल्यावर दरवळणारे चंदन

हवा बहर



मला शब्दांना वळण द्यायचे होते
वळणावरचे शब्द वेचायचे नव्हते

मला बहरलेला वृक्ष  बघायचा  होता
पिकलेली पान  गळताना  पाहायची नव्हती

मला फुलांचा सुगंध अनुभवायचा होता
त्यासाठी फुलाला वेलिपासुन अलग करायचे नव्हते

मला निसर्गाचा आनंद लुटायचा होता
पण त्यासाठी निसर्गाचा नाश मान्य नव्हता


मला आनंदाने खूप नाचायचे होते
त्यासाठी दुसर्‍याच्या भावनांना दुखवायचे नव्हते


मला आकाशात उंच भरारी घ्यायची होती
पण त्यासाठी पक्ष्यांचे पंख छाटायचे नव्हते

मला तुझ्यातच गुंतून जायचे होते
तुझ्यापासून अलग जगायचे नव्हते



बुधवार, ६ जुलै, २०११

शब्दांच्या कवेत


शब्दांनी शब्द रचून 
शब्दांना ओवणारी मी 

शब्दांच्या नावेवर बसून 
हेलकावे खाणार मी

शब्दांच्या कवेत जाऊन 
शब्दांची उब घेणार मी

शब्दांच्या अंगणात जाऊन 
शब्दांची रांगोळी घालणार मी

शब्दांशी हितगुज करून मग
निःशब्द अबोल होणार मी

कळीचे उमलणे



वसंतातली पालवी फुटण्यात 
आनंद मानून घे
आणि शिशिरातल्या पानाझाडीला 
तू विसरून जा 

                 प्रत्येक सुरुवातीला शेवट 
                 तू मानू नकोस 
                 कारण त्याच शेवटानंतर होणारी 
                 सुरुवात तू लक्षात घे 

कळीचा उमलणं तुला दिसेल तसं
फुलाचं कोमेजणं ही दिसेल 
काळीच उमलणं लक्षात घे आणि 
फुलाचं कोमेजणं सहज विसरून जा

अशी कविता...



                                      अशी कविता 
 फुलांप्रमाणे हळुवार उमलते
काट्याप्रमाणे चटकन रुतते 
रणरणत्या उन्हात चांदणे भासविते
                                   अशी कविता 

शरदाच्या चांदण्यात भिजवून टाकते 
ग्रीष्मात पिसारा फुलवून जाते
आभालाप्रमाणे शब्दांनी भरून येते
                                   अशी कविता 

भावनांना शब्दांची साथ देते 
इंद्रधनऊच्या रंगानी रंगून जाते
निसर्गासोबत बहरून येते
                                    अशी कविता 

प्रेमिकांचे प्रेम जपते
भाविकांचे भाव जपते 
शृंगाराने स्वतःच लपते 
                                   अशी कविता 

र्हुदायाच्या पानावर दव शिंपडते 
वाऱ्याच्या झोक्यावर झुलून जाते 
दोन जीवांचे मिलन घडविते 
                                  अशी कविता 

दगडालाही पाझर फोडते 
हवेत गिरक्या घेऊन जाते 
वाटसरूला वाट दाखविते 
                                  अशी कविता 

वार्धक्यात तारुण्याची जाणीव होते 
क्रांतीची मशाल पेटवून ठेवते 
काविचेही मन जाणते
                                  अशी कविता