फुलांप्रमाणे हळुवार उमलते
काट्याप्रमाणे चटकन रुतते
रणरणत्या उन्हात चांदणे भासविते
अशी कविता
शरदाच्या चांदण्यात भिजवून टाकते
आभालाप्रमाणे शब्दांनी भरून येते
अशी कविता
भावनांना शब्दांची साथ देते
इंद्रधनऊच्या रंगानी रंगून जाते
निसर्गासोबत बहरून येते
अशी कविता
प्रेमिकांचे प्रेम जपते
शृंगाराने स्वतःच लपते
अशी कविता
र्हुदायाच्या पानावर दव शिंपडते
वाऱ्याच्या झोक्यावर झुलून जाते
दोन जीवांचे मिलन घडविते
अशी कविता
दगडालाही पाझर फोडते
वाटसरूला वाट दाखविते
अशी कविता
वार्धक्यात तारुण्याची जाणीव होते
क्रांतीची मशाल पेटवून ठेवते
काविचेही मन जाणते
अशी कविता
वा, वा. ब्लॉग जगतात मन:पूर्वक स्वागत.
उत्तर द्याहटवाधन्यवाद अतुल
उत्तर द्याहटवाkhup chan
उत्तर द्याहटवाvelecha chhan sadupayog chalu aahe.aapalya chhandachi japanuk karane hach velecha sadupayog aahe.
उत्तर द्याहटवाधन्यवाद स्मिता...
उत्तर द्याहटवाधन्यवाद आई,
उत्तर द्याहटवाआणि अग वेळेचा सदुपयोग करणे तुमच्याकडुनच शिकले आहे.
Delightful!
उत्तर द्याहटवाThnq so much
उत्तर द्याहटवा