माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?
सत्याचे गाव दिसत असूनही
मी स्वप्नांच्या गावी का जाते?
कळीच्या उमळण्याला मी संपणे का म्हणते?
पिकलेलं पान गळायाच्या आधी माझी मान का वळते?
माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?
घुंगराच्या बोलांवर मी शांत
बसुच कशी शकते?
सुरांच्या मैफीलीत जाउनही मी
मनातल्या मनातच का गुणगुणते?
माझ्या भावना ओळखीच्या असूनही
त्या मी अनोळखी का मानते?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा