शुक्रवार, ८ जुलै, २०११

हवा बहर



मला शब्दांना वळण द्यायचे होते
वळणावरचे शब्द वेचायचे नव्हते

मला बहरलेला वृक्ष  बघायचा  होता
पिकलेली पान  गळताना  पाहायची नव्हती

मला फुलांचा सुगंध अनुभवायचा होता
त्यासाठी फुलाला वेलिपासुन अलग करायचे नव्हते

मला निसर्गाचा आनंद लुटायचा होता
पण त्यासाठी निसर्गाचा नाश मान्य नव्हता


मला आनंदाने खूप नाचायचे होते
त्यासाठी दुसर्‍याच्या भावनांना दुखवायचे नव्हते


मला आकाशात उंच भरारी घ्यायची होती
पण त्यासाठी पक्ष्यांचे पंख छाटायचे नव्हते

मला तुझ्यातच गुंतून जायचे होते
तुझ्यापासून अलग जगायचे नव्हते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा