रविवार, १७ जुलै, २०११

आयुष्याच्या वाटेवर....



खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

एक वळण संपल्यावर दुसरे शोधावे लागतेच का?
रखरखत्या उन्हातही सावली शोधावी लागतेच का?
काटेरी कुंपण ओलांडल्यवरही लाकडी दार असतेच का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

प्रेमाचा भंग झाल्यावरही प्रेम जपावे लागतेच का?
विरहाच्या अश्रूंना देखील रुमलची गरज असते का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

सादानंतर प्रतिसादाची खरी गरज असते का?
सुखाबरोबर दु:खाची छटा असावी लागते का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....

तारुण्यानंतर वार्धक्याची चाहूल यावी लागतेच का?
कवितेसाठी शब्दांची गरज असावी लागतेच का?

खरंच आयुष्याच्या वाटेवर चालतांना....
एक वळण संपल्यावर दुसरे शोधावे लागतेच का?

२ टिप्पण्या: