रविवार, १० जुलै, २०११

आठवतंय तुला?

*अबोल नाते* 

आठवतंय तुला?
आपलं हातात हात घालून
बागेतून फिरत राहणं
जाताना तू कळीच असायचीस
पण येताना फुलाप्रमाणे फुलून यायचीस

   आठवतंय तुला?
   मला जीवनाच्या वाटेवर
   ठेच लागली तेव्हा
   संपूर्ण जीवनाचा अर्थ समजवताना
   माझ्या जखमेवर मलम् लावायचीस

आठवतय तुला? 
आपल्या नात्याला आपण शब्दांचे 
बोल देऊच शकलो नाही 
कारण आपले अबोल बोल देखील बोलके होते

आठवतंय तुला?
मी तुला एकदाच म्हटलं होतं
तुला डोळे भरून पाहायचं आहे
तू याच एका वाक्यासाठी स्वत:चे
डोळे मला देऊन निघून गेलीस.....!

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा