विरह या शब्दाचा अर्थ नेहमी नकारात्मक का घेता हो,
त्यातच तर खरी प्रगती शोधा ना हो
मुलं चांगली शिकावी, नोकरी करावी मोठ्या शहरात,
म्हणून जन्मभर काबाड कष्ट आई वडील करतात
मग नोकरीसाठी जातांना विरहाचे अश्रु गाळतात,
पक्षी उडून गेला म्हणत, आठवण करत बसतात
मुलगी सासरी जाणार म्हणून विरहाचे अश्रु येतात,
तिचे लग्न होऊन ती सुखी राहावी म्हणून हेच चप्पल घासतात,
बदलुयात ना अर्थ, विरह म्हणजे अश्रु याचे गणित,
याच विरहामुळे होणारी प्रगतीचे करुया प्रणित
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा