शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

माझी शाळा

शाळा सुटली पाटी फुटली, 

आई मला भूक लागली 

लहानपणीचे ब्रीद वाक्य हे,

आज आवर्जून आठवते


मित्र मैत्रिणींच्या भेटीची ओढ असायची,

शेजारी आपल्या मैत्रिणीची जागा पकडायची 

प्रार्थनेसाठी रांग बनायची, 

किलकिले डोळे उघडून पाहण्याची मजा वेगळीच असायची


घंटा वाजली की पुढच्या तासाची वही उघडायची घाई,

तास सुरू असताना उगाच खिडकीतून बाहेर डोकावून पाही 

मधल्या सुट्टीत डब्यांची वाटावाटी व्हायची, 

पुढचे तास मात्र जांभई देण्यात जाई


आता ओनलाइन शाळांमुळे लागली आहे वाट,

शिक्षक विद्यार्थी आपापल्या घरात 

वह्या पुस्तकांची जागा लॅपटॉपने घेतली, 

शिक्षकांची बिचार्‍यांची तारांबळ उडाली 


शाळा सुरू व्हायची आता ओढ लागली आहे,

मित्र मैत्रिणींना भेटायची आस लागली आहे 

शिक्षकांची छडी देखील आठवायला लागली आहे, 

माझ्या शाळेची इमारत जणु मला बोलवायला लागली आहे 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा