देवा शपथ खर सांगेन खोट कधी बोलत नाही,
प्रामाणिकपणा अंगी असेल अशी शपथ घ्यावी लागत नाही
लहानपणापासुन खर बोलाव, सत्याचीच साथ द्यावी,
असेच धडे मनावर पावलो पावली कोरले जाई
मोठे झाल्यावर काहींना या शिकवणी विसर पडतो,
मग चुका लपवता लपवता सगळा जन्म वाया जातो
चुकांची माफी मागायला मोठी हिम्मत हवी
स्विकार नाही केला तर होऊन बसते चुक नवी
सत्याचा नेहमी होतो जयजयकार
अहो असत्याचा मार्ग खुपच बेकार
श्रीरामाने देखील सत्यासाठी सीता माईची परिक्षा घेतली,
मग सामान्य जनतेला देखील या सत्याची किमत कळली
आता तरी अधर्माची साथ सोडून सत्यमेव जयते म्हणुयात,
आपला विकास तर देशाचा विकास याचे धडे गिरवूयात
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा