बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

गंध ओल्या मातीचा

ओल्या शेताचा तो गंध

दरवळून टाके आसमंत 

काळ्या मातीचा सुगंध 

करत असे मन शांत


शेतकरी राहत असे हवालदिल 

फाडत असे चुकीचे बिल 

कर्जाचा डोंगर पेलत असे 

कायद्याची त्यास जाण नसे 


आज ही काळी आई 

फक्त शेतमजूराची होई

कष्टाचं त्याच्या होईल चीज 

लाभार्थी होशील आता शांत नीज 


ओल्या मातीचा तो सुवास 

शेतकर्‍यांचा बनलाय श्वास 

नष्ट होईल तुझे पारतंत्र्य 

मिळाले आहे तुज स्वातंत्र्य 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा