बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

बाप्पा मोरया

 तुझ्या आगमनाची चाहूल लागताच सगळे बाजारही सजतात, 

तुझे रूप मनी चिंतुन आपल्या जातीलाही विसरतात 


तुझी माया अशीच राहू दे 

जातीची कवाडं बंद होऊ दे 

प्रत्येकात ऐक्य वाढु दे

हाच तुझा आशिर्वाद असु दे 


दहा दिवस तुझ्या उत्सवात परंपरेची जाणीव होते, 

भक्तांच्या मनोकामना तुझ्या ठाई पूर्ण होते


तुझ्या परतीचा दिवस येतो,

प्रत्येक भक्त मग हळवा होतो


पाठवण करतांना उर भरून येतो

नभातला थेंब मग डोळ्यातून वाहतो 


गणपती बाप्पा मोरया 

पुढच्या वर्षी लवकर या 

याचा गजर दाही दिशांना घुमतो 

पाणावले डोळे भक्त जड अंतःकरणाने पुसतो


सौ अर्चना दीक्षित 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा