मोठमोठे नेते येऊन इथे करतात प्रचार,
पुर्वीसारखा लाऊ म्हणे आठवडा बाजार
फक्त भाजीपालाच काय,खरेदी करा वस्तू इथे गरजेच्या,
इमारती बांधू इथे मोठ्या मोठ्या
दुकानांच्या
ब्रँडेड आयटमची ऊभारूयात दालनं,
पैशाची गुंतवणूक करण्याची योजना आखालनं
नका करू असं मालक गरीब होऊन जाईल लाचार,
प्रत्येकाच्या मेहनतीचा होऊद्या ना प्रचार
एकमेकांना सहाय्य करू
बनुयात वोकल फॉर लोकल,
आठवडाच काय बाजार भरवू आपण बनुयात ग्लोबल
गरीब श्रीमंत असा भेदभाव रहाणार नाही,
एकात्मतेविरूद्ध बोलणारी तोंडच उघडणार नाही
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा