संकल्प आज आपल्याला करायचा आहे,
आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे.
लोकल बद्दल वोकल आपल्याला व्हायचे आहे,
भारताची प्रगती करायची आहे.
पैसा आहे , लोकशाही आहे,
बास आपली इच्छा शक्ती हवी आहे.
बदलुयात भारतला आज,
चढवू त्यावर आपल्या मेहनतीचा ताज.
अभिमान आहे मला, गर्व आहे मला,
विश्वास आहे आपल्या साथीचा मला.
बिकट परिस्थितीला संधी मानणे,
हेच आहे एक मनापासून मागणे.
हिच एक संधी, भारताचा इतिहास बदलण्याची,
आणि स्वतःच्या योग्यतेची जाणिव करून घ्यायची.
अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा