टाळी नसते एका हाताची,
तशीच गत संसाराची
दोन जीवांचे असती बंध,
जणू आयुष्यभर दरवळी सुगंध
पती पत्नी म्हणून होतो आरंभ,
नाजुकशा नात्याचे ते आधारस्तंभ
बंध रेशमाचे घेत जुळवून,
परिपक्व नात्याला देत उजळवून
जाणून भावना एकमेकांच्या,
अलगद मनातील अंतरीच्या
हात हातात देऊन संयमाने,
आधार बनत केवळ नजरेने
भातुकलीचा हा नसे खेळ,
दोन जीवांचा इथे असे मेळ
भक्कम पायाची ही वेल संसाराची,
उलगडत जाणारी ही वाट आयुष्यभराची
सौ अर्चना दीक्षित
मुंबई