सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

करू गौरव मानवाचा

जान है तो जहान है, 

हे वाक्य खर आहे 


आज याची खरी येते प्रचिती,

प्रत्येकाला आहे जीवाची भीती


माझे कुटुंब माझी जबाबदारी, 

याची प्रत्येक जण घेतं खबरदारी 


आज मानवाने मानवतेची राखली लाज, 

म्हणून तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी टळली आज


करुयात गौरव मानवतेचा, 

भीषण परिस्थितीत लढणाऱ्या योद्धांचा


एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, 

हेच सांगत आहेत आपले महान ग्रंथ 


आपल्या देशाची हीच आहे महानता, 

येथे जपली जाते मानवता 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा