*स्वत्त्वाचा शोध*
शोध माझ्या मनाचा
माझ्या अंतरातील भावनांचा
कन्येतून *स्रीत्त्वाचा*
स्रीतून *पत्नीत्त्वाचा*
पत्नीतून *मातृत्त्वाचा*
शोध माझ्या मनाचा
असलेल्या परिस्थितीत समाधानाचा
नकारापेक्षा सकारात्मकतेचा
जुळवलेल्या नात्यांचा
शोध माझ्या मनाचा
*शोध* स्वकर्तृत्वाचा
अंगी असलेल्या कला गुणांचा
कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याचा
शोध माझ्या मनाचा
शोध घेते शब्दांचा
संग्रही साठवण्याचा
साठवणीतील आठवणींचा
शोध माझ्या मनाचा
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा