नातीगोती काळाप्रमाणे बदलत असतात,
प्रत्येक क्षणाला साथ देतात, तीच खरी नाती असतात
नात्यात असतात, मित्र मैत्रिणी, सखे सोबती,
जे असतात आपल्या अवतीभवती
कोणत्याही परिस्थितीत धावून येणारे
सुख दुःखातही तारून नेणारे
भेटवस्तुंचा जिव्हाळा नसतो,
फक्त भेटीचा लळा असतो
या नात्याला नाव ठेवायचे नसते,
याला योग्य नाव द्यायचे असते
भेटल्यानंतर उत्साहाला उधाण येतं,
उत्सवात नात्यांच्या असच असतं
सौ अर्चना दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा