विषय आजचा मुक्त विचारांचा,
शब्दांतही बांधणे झाले कठीण
निसर्गाच्या अमाप संपत्तीला,
आज शब्दात बांधणे झाले कठीण
नात्यांच्या त्या अलगद धाग्यांना,
आज शब्दात बांधणे झाले कठीण
तिने त्याच्या, त्याने तिच्या भावनांना
आज शब्दात बांधणे झाले कठीण
विषय नसला कवीच्या शब्दांना,
तर विचारांना आवर घालणे कठीण
विषय उद्याचा द्या आवडीचा,
तर शब्द गुंफणे नसे कठीण
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा