कोणत्याही विषयावर शब्दांची जुळवाजुळव
कदाचित सोपी असेल,
पण आई वडीलांची महती लिहीता लिहीता
एक आयुष्य अपुरे पडेल
आजच पहा ना विषय लेखनाचा
अवघड वाटू लागला,
लेखणी हातात घेऊन
प्रत्येक जण शब्द जुळवू लागला
मनी शब्दांची साठवण करुन
आठवणी आठवू लागला,
तरीही शब्दांच्या अंगणात
तो योग्य शब्द वेचु लागला
आठवणींनी माय बापाच्या
उर भरून येत असे रे,
म्हणूनच तर पटते
माय बाप हे खऱ्या अर्थी देव खरे
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा