मायेची ममता
असते त्यात समानता
मुलगा, मुलगी फरक नसतो,
लहान, मोठ्याची तुलना नसते
नि:स्वार्थ तिचे प्रेम असते,
मुलांचे भविष्य तिला घडवायचे असते
वेळ पडल्यास ती कठोर बनते,
तरच तर घडलेली चूक मुलांना कळते
ममतेला तिच्या अंतर देऊ नका कधी,
नमन करा तिला सत्कार्य करण्या आधी
दूर गेली मुलं जरी
आईची नजर नेहमी त्यांच्यावरी
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा