रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

वळ उठला पाठीवर

 नियतीचा खेळ मांडला जीवन पटावर

जणू वळ उठला पाठीवर


विवाहित जीवनातील आठवणी कोरल्या आहेत मनावर

पण एका काळचक्राने घाव घातला आयुष्यावर 

जणू वळ उठला पाठीवर


ताबा राहत नव्हता मनावर 

घात हा पुरेल आयुष्यभर 

जणू वळ उठला पाठीवर


किती काळ लोटला आजवर 

उरलेल्या संसाराची जवाबदारी माझ्यावर

जणू वळ उडला पाठीवर 


पुन्हा नव्याने सुरू करेन सत्वर 

करून नव्या पार्श्वभूमीवर 

जरी वळ उठला पाठीवर


विश्वास आहे स्व कर्तुत्वावर

राहील ताबा ही मनावर 

जरी वळ उठला पाठीवर 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा