शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

तू दुर्गा तू चण्डीका

 काळाची मला गरज बनायचंय, 

बाबांची लाडकी परी बनण्याबरोबरच

मला बाबांची शेरनी बनायचयं


स्री हे देवीचं रूप, हे वाक्य खर करायचं, 

मां दुर्गा बनण्याबरोबर

मां चण्डीचे रूपही दाखवायचं


स्रीच्या अनेक भूमिकांमधून मला जायचय,

या भुमिका संभाळण्याबरोबर

वाईट नजरेने पाहणाऱ्यांना माझं खरं रूप दाखवायचं 


बलात्कारी नराधमांना धडा शिकवायचायं,

मुलींना सक्षम बनवण्याबरोबर

मुलांना देखील मर्यादा पुरुषोत्तम बनवणे गरचेयं


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा