गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

माझे बाबा

धीर, गंभीर आणि खंबीर, 

वेळ पडल्यास मजेशीर 


प्रेम, आत्मियता, जिव्हाळा,

वेळोवेळी लावतात लळा 


कोणी म्हणे यांना भक्कम आधार, 

कुटुंबासाठी करतात कष्ट अपार


कधी मृदु तर कधी कठोर,

त्यांच्या धाकाने सुधरते पोर 


कष्टाची झळ लागू नाही देत कधी, 

संसाराची जवाबदारी स्वीकारतात सगळ्यात आधी


त्यांच्या नसण्याने विसकटते घर, 

अस्तित्वानेच त्यांच्या येई बहर 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा