मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

बिनधास्त बंदिस्त

मी काय म्हणते,  कशाला मानायचे जीवनाला बंदिस्त,

त्यापेक्षा आपणच आपल्याला लाऊयात ना शिस्त 


डोळ्यासमोर उभी करून प्रतिमा एखादी भारदस्त, 

मग तसच बनायचं म्हणून काम करुयात रास्त 


इथे बाजारात मिळत नाही ना काहीही स्वस्त,

मग मुठ गिळून गरीबाच पोरगं शांत बसत


बाप ज्याचा श्रीमंत,  त्याच पोरग आहे बिनधास्त,

त्याच्या गावी कधी नाही,  काय महाग, तर काय स्वस्त 


आपल्याच मनात उगाच विचार घालतात गस्त, 

मुक्त करा विचारांना,  ठेऊ नका त्यांना बंदिस्त 


मग मन पाखरू भिरभिरतांना आपल्याला दिसत, 

व्हा कधीतरी बेफिकीर,  जगा एकदम बिनधास्त 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा