गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

तू चांदणी नभातली

सप्तर्षींच्या मैफिलीतली

तू चांदणी नभातली 


अनेक तारकांनी वेढलेली

तू चांदणी नभातली


तरीही स्वतःचे अस्तित्व टिकवलेली 

तू चांदणी नभातली 


चंद्रालाही भाळलेली 

तू चांदणी नभातली


कवी कल्पनेची सावली

तू चांदणी नभातली


रात्रीच्या अंधारात सावरलेली 

तू चांदणी नभातली


कोमलतेने सजलेली 

तू चांदणी नभातली 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा