मुलगा असतो
वंशाचा दिवा,
तर मुलगी असते
दिव्याची वात
मुलगा असावा
मर्यादा पुरुषोत्तम,
तर मुलीला असावी
मर्यादांची जाणीव
आता नाही कोणी करत
अर्भकाची लिंग चाचणी,
उलट मुलगी हवी म्हणून
करतात देवाकडे मागणी
लेकीच्या ठाई असते
माया आभाळाची,
माहेरची लाडकी,
होते सुन दिल्या घरची
म्हणून तर केले मी
देवाजवळ नवस अनेक,
मुलगा झाला आता हवी
मला लाडाची लेक
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा