सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

वेदना नव्हे संवेदना

स्री नेहमीच सक्षम होती, आहे आणि राहाणार,

स्रीयांनी घडवलेला इतिहास अजरामर राहणार 


तिला सहानुभूतीची गरज नसते,

बस प्रोत्साहनाची गरज असते


तिच्या वेदना तिची कमजोरी नसते, 

उलट संवेदनशील राहून आपले ध्येय साधते 


नारी ही केवळ अबला आहे,

हा तर फक्त बोलबाला आहे 


वेळ प्रसंगी ती भावुक बनते, 

वेळ आली तर ती शस्त्र हाती घेते


तिची लिला आहे अपरंपार,

म्हणून तर सुरू आहे हा संसार


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा