अंतरीच्या भावनांना आज
शब्दात व्यक्त करु कशी,
स्पर्शात तुझ्या मोहून जाते,
प्रित वेडी प्रेयसी जशी
वेली झाडात गुफणे
साजणा कळते कसे,
शब्द वेड्या लेखकाला
शब्द सुचतात जसे
क्षितीजावर मृगजळाचे
खेळ का कोणास दिसे,
मृगनैनाच्या शोधार्थ आज
मन जणू वेडेपिसे
गूज आहे अंतरीचे
भावूनी जाते कसे,
सख्या तुझ्या भेटीत
आज मी मोहूनी जाते जसे
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा